गवार भाजी (सिंधी पद्धत)
साहित्य:
मोडलेली गवार, कांदा, टोमॅटो,लसूण,हिरवी मिरची,आले,कोथिंबीर,जिरे,तिखट,हळद,मीठ,तेल
कृती:
१.प्रथम गवार मीठ घालून कुकरमध्ये २ शिट्या काढून शिजवून घेणे.
२. तेलात जिरे फोडणीला घालून त्यात कांदा बारीक चिरून परतणे.
३. हिरवी मिरची, कोथिंबीर, आले व लसूण कुटून घावे (मिक्सरमध्ये वाटू नये).
४.मग टॉमेटो घालून परतावे.
५. हा मसाला कांद्यावर परतावा. फार वेळ परतू नये.
६.मग सुके मसाले मीठ घालून शिजवलेली गवार पिळून त्यात घालावी. थोडी मॅश करावी. ७.हवे असेल तर थोडे आमचूर घालावे.
अशी हिरवीगार गवार छान लागते.
रिमा मंकीकर
धन्यवाद!!
#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
[30/09, 8:49 pm] डॉ. अर्चना चव्हाण अन्नपूर्णा: *मालवणी मसाला🥀*
साहित्य :
अर्धा किलो धणे, प्रत्येकी १० ग्रॅम दालचिनी, लवंगा, बाद्यान, नागकेशर, तमालपत्रे, जिरे, मोहरी, काळे मिरे, बडीशेप, ४-५ मसाला वेलदोडे, ५ग्रॅम जायपत्री, ५ ग्रॅम शहाजिरे.
कृती :
सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून घेऊन त्याची बारीक पूड करून ठेवा.
दीपाली प्रसाद
धन्यवाद!
#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
No comments:
Post a Comment