लाल माठाची भाजी
आमची पारंपरिक कोकणी पद्धत
साहित्य व कृती :
•लाल माठाची भाजी निवडून, स्वच्छ धुवून घ्यायची..
•बारीक खुडायची किंवा चिरायची.
•एका जाड बुडाच्या पातेल्यात चिरलेली भाजी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची चिरून टाकावी.
•पाणी अजिबात न घालता पातेलं मंद आचेवर ठेवून वाफेवर शिजवायची.
• शेवटी मीठ घालून ढवळायची आणि चमचा दोनचमचा कच्चं तेल घालून दोन मिनिटं झाकण ठेवून वाफवायची.
•अगदी उतरताना ओल्या नारळाचं खवलेलं खोबरं भुरभुरावं..
मस्त भाजी तयार.
संजय गावडे
धन्यवाद!
#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
No comments:
Post a Comment