Monday, November 12, 2018

कमलकाकडी कोफ्ता करी

कमलकाकडी कोफ्ता करी

◆साहित्य:

•कमलकाकडी
•जिरं पावडर
•धणे पावडर
•मिरची पावडर
•बेसन
•कोथिंबीर

◆कृती :

●कमलकाकडी धुऊन बटाट्याप्रमाणे साले काढून त्याचे लहानलहान तुकडे करुन पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घ्यावे.
● वाफवून गार झाल्यावर त्यात जीरापावडर, धणापावडर, मिरचीपावडर, मीठ व थोडे बेसन घालून चांगले एकजीव करून ठेवावे.
●शेवभाजीप्रमाणे रस्सा बनवून रसाला चांगली उकळी आली की त्यात कोफ्ते बनवून सोडावे, उकळ आल्यावर गॅस बंद करुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

■■ता क - कोफ्ताचे थोडे मिश्रण बाजूला ठेवून त्याचे भजेही तळले, चव अप्रतिमच लागली, त्यामुळे आता पुढील वेळी बटाटा भजीप्रमाणे करण्याचा विचार आहेच.

दीपाली प्रसाद

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment