Thursday, November 15, 2018

शेंगदाण्याचा महाद्या

शेंगदाण्याचा महाद्या...

या पाककृतीत कोणतीही फळभाजी,शेंगभाजी किंवा फूलभाजी नाही. कदाचित म्हणूनच " महाद्या "या परोपकारी गंपूप्रमाणे सगळ्या लोकांना उपयोगी पडणारा ,अडचणीत मदतीला धावून येणा-या मुलाचं नाव या पाककृती ला पडलं असावं ,असा माझा तर्क आहे. कारण तो प्रकार असाच आहे.घरातभाजी नसताना करता येतो,डब्यात,सहलीलाही नेता येतो.चपाती ,भाकरी,भातासोबतही खाता येतो.शिवाय अबालवृद्ध सर्वांनाच आवडतो.

साहित्य :

•खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं अर्धंबोबडं कूट ,
•बारीक चिरलेला भरपूर
•कांदा,
•टोमॅटो ,
•तिखट,
•मीठ,
•हळद ,
•थोडंसं तेल.

कृती :

●अगदी थोड्या तेलावर जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी करून कांदा टोमॅटो रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे तिखट,हळद घालून थोडंसं पाणी घालावे .
●उकळी आल्यावर त्यात शेंगदाण्याचं अर्धंबोबडं कूट घालून चवीनुसार मीठ,गरम मसाला घालून झाकण ठेवावं.
●लगेचच शिजते शेंगदाण्याचं कूट.
●तेल,मीठ जपून वापरावं.कारण शेंगदाण्याचं तेल सुटतंच.
●या महाद्या चा घट्ट पातळपणा आपण ठरवू तसा... ●मी करताना नेहमी पिठल्याप्रमाणे अंगापुरतं पाणी घालून करते.पळीवाढं...काही जण पातळसरही करतात.
●नक्की करून पहा.

सविता कारंजकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment