Wednesday, November 14, 2018

खारापुरी :
    हा पदार्थ मी लग्नानंतर बघितला. कन्नड मधे खारा म्हणजे तिखट. आगळा वेगळा हा तिखट पुऱ्यांचा प्रकार माझ्या सासरी दसरा दिवाळीला करतात.४-५ दिवस सहज टाकतात या पुऱ्या!!

साहित्य :

१.पारीसाठी:
          मैदा, ओवा, शेंगदाणे तेल, मीठ
   
२.पुरणासाठी:
        बेसन, हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, हळद, धणेपूड, जिरेपूड, मीठ.
तळण्यासाठी शेंगदाणे तेल.

कृती:

१.सर्व प्रथम पारीसाठी मैद्यामधे ओवा, मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट कणीक मळून १/२ तास ठेवून द्यावी.
२. पुरणासाठी बेसन, हिरव्या मिरचीचा ठेचा, हिंग, हळद, धणेपूड, जिरेपूड,बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मीठ घालून सगळे एकत्र घट्ट मळावे.
३. पुऱ्या तळण्यासाठी कढईमधे तेल तापवत ठेवावे.
४.कणकेची लिंबाएवढ्या गोळ्याची पारी बनवून त्यामधे तेवढ्याच आकाराचे बेसनाचे मिश्रण घेऊन पोळी साठी पुरण घेऊन पारी बंद करतो तसे करावे.
५.पोळपाटावर हलक्या हाताने याच्या पुऱ्या तेलावर लाटाव्यात.
६.या पुऱ्या नेहमीच्या पुऱ्यापेक्षा मोठ्या असतात.
७. मंद आचेवर एक-एक पुरी तळावी.

मस्त चटपटीत पदार्थ आहे हा. नक्की करून बघा.
  
डॉ.अस्मिता भस्मे
धन्यवाद!!

#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी  प्रतिष्ठान

No comments:

Post a Comment