भरलेली कारली
साहित्य:कारली, कांदा, जिरे, तिखट,हळद, आमचूर पावडर,गरम मसाला (आवडत असल्यास) मीठ,कोथिंबीर,तेल.
कृती:
•कारल्याचा वरचा भाग जरा किसून काढावा. •मग मध्ये एक चीर देऊन मिठाच्या पाण्यात उकळावी.
•उतरवून त्यातील बिया छोट्या चमच्याने काढून टाकाव्यात.
•एका कढईत तेल घालून त्यावर जिरे परतून कांदा परतावा बाकी मसाले घालावेत.
• कोथिंबीर घालून थोडे थंड करून वरील कारल्यामध्ये भरावेत जर वाटत असेल मसाला बाहेर येईल तर दोरा बांधावा.
•थोड्या तेलात भरलेली कारली परतावीत. •शिजलेली असल्यामुळे जास्त परतायची गरज नाही.
रिमा मंकीकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment