Tuesday, November 13, 2018

मोहनथाळ

मोहनथाळ

साहित्य :

•१वाटी चणाडाळीचे पीठ,
•तूप,
•दूध,
•केशर,
•खवा,
•१वाटी साखर,
•सुकामेवा,
•वेलची पूड

कृती :

◆सर्वप्रथम भांड्यात चणाडाळीचे पीठ, १ चमचा दूध व १ चमचा तूप एकत्र करून ठेवावे, मग तयार मिश्रण ५ मिनिटा नंतर चाळून घ्यावे.
◆भांड्यात १/२ वाटी तूप गरम करून त्यात चाळलेले चणाडाळीचे पीठ भाजून घ्यावे .
◆ दुसर्‍या भांड्यात साधारण १ वाटी साखर व साखर बुडेल इतके पाणी एकत्र गरम करून त्याचा पाक तयार करावा.
◆भाजलेल्या चणाडाळीच्या मिश्रणामध्ये खवा, सुकामेवा व साखरेचा पाक घालून, तूप लावलेल्या ताटात थापावे व सेट करायला ठेवावे.

वैशाली वेटाळे

धन्यवाद!!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment