चकली
■साहित्य:
●१किलो तांदूळ
●५०० ग्रॅम हरभरा डाळ
●५० ग्रॅम शाबू
●५० ग्रॅम उडीद डाळ
●५० ग्रॅम फुटाणा डाळ
●५० ग्रॅम पोहे
●चकली मसाला पूर्ण एक पाकिट
■ कृती:
◆उडीद डाळ सोडून सर्व चांगले भाजून घ्यावे.
◆एका पातेल्यात ५० ग्रॅम तेल गरम करून त्यात तिखट घालून १ किलोला १ लीटर पाणी घालून थोडी उकळी आणावी.
◆त्यामध्ये सर्व पिठं मिक्स करावे आणि थोडा वेळ झाकून ठेवावे.
◆नंतर लागेल तसं मळून घ्यावे व चकली तयार करून छान तळून घ्यावी.
सौ. वैशाली वेटाळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment