सोयाबीन कटलेट
साहित्य:
सोयाबीन, उकडलेला बटाटा, भाजणीचे पीठ, आलं,लसूण पेस्ट, कोथिंबीर, तिखट, मीठ, तेल.
कृती:
•सोयाबीन गरम पाण्यात भिजत घालून दोन तीन तासाने चांगले फुगल्यानंतर दाबून त्यातील पाणी काढून मिक्सरला बारीक करून घेणे.
•नंतर एका कढईत बारीक केलेला सोयाबीन, कुस्करलेला बटाटा गॅसवर ठेवून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट,तिखट ,मीठ घालून एक वाफ काढणे.
•गार झाल्यानंतर त्यामध्ये भाजणी पीठ, कोथिंबीर घालून चांगले मळून घेऊन त्याचे छोटे कटलेट करुन तांदळाच्या पिठात घोळवून शॅलो फ्राय करणे.
•खंमग कटलेट तयार.
वैशाली हेगिष्टे
धन्यवाद !!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment