Wednesday, November 14, 2018

लापशी-डिंक-मेथी लाडू

साहित्य:-
बारीक लापशी,डिंक-२:१,मेथी
काजू,बदाम,अक्रोड,पिस्ता,खारीक,अंजीर,वेलची,किसमिस,चारोळी,सफेद तीळ,अहळीव,वाटलेली साखर,गूळ, तूप

कृती:-
१. लापशी,मेथी वेगवेगळे थोडे थोडे तूप टाकून खरपूस भाजून घ्यावे.
२.डिंक थोड्या थोड्या तुपात तळून घ्यावा.
३.खारीक,अंजीर, किसमिस बारीक कापून घ्यावे व तुपावर व्यवस्थित तळून घ्यावे. अहळीव त्यात नंतर टाकावे.
४.उरलेले ड्रायफ्रूट तुपावर भाजून घ्यावे.
५.वरील सर्व साहित्य मिक्सरला एकानंतर एक एकदम बारीक दळून घ्यावे.
६.एक मोठी परात घेऊन सर्व एकत्र करून त्यात दळलेली साखर मिसळावी.
७.गूळ चिरून त्यात तूप घालून छान उकळून घ्यावे व थोड्या थोड्या मिश्रणावर टाकून लाडू वळून घ्यावे....

टीप:-अंजीर ,खारीक,किसमिस थोडे जास्तच घ्यावे...भारी लागतात हे लाडू!!

मृणाल  पाटोळे
धन्यवाद!!

#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

No comments:

Post a Comment