Wednesday, November 14, 2018

कारल्याची चटणी

कारल्याची चटणी

कारली, नारळ, सुखी लाल मिर्ची,चिंच,मीठ,कांदा

कारली बारीक चिरुन मीठ लावून ठेवावे. थोड्या वेळाने पिळून तेलात कुरकुरित होईपर्यंत परतावे.नारळ,मिर्ची,चिंच,मीठ घालून चटनी वाटून घ्यावी. आयत्या वेळी चटनी, बारीक चिरलेला कांदा, कारली घालून मिक्स करावी अन्न: बाहेर भरपूर पाऊस पडतोय, गारेगार वातावरण अशावेळी चटपटीत खाण्याची इच्छा न होणारा विरळाच कालच शेतातुन मिरच्या आणलेल्या ,लांबलचक, टवटवीत मनातच भरल्या ठरवुनच टाकले यांची एक मस्त रेसिपी करायची

कृती

१५ते २० मिरच्या ,धुऊन पुसुन घ्यायच्या मधुन एक उभी चिर द्यावी देठ तसेच ठेवावे ,(त्यामुळे भाजताना ठसका लागत नाही)थोडे शेंगदाणे कुट, मीठ ,थोडी साखर व अर्धा लिंबू पिळावे ते मिश्रण मिरची त भरुन लोखंडी तव्यात मिरच्या खरपूस भाजून घ्याव्या भाजताना वरून चिमूटभर हळद ,चिमूटभर हिंग टाकावा अगदीच थोडे ते ल व अर्धबोबड शेंगदाणे कुट घालावे (अर्धबोबड हा अन्नपूर्णा ग्रुपमधील सर्वात आवडलेला शब्द,मनात चपखल बसला) मिरच्या सर्वच बाजूने व्यवस्थित भाजुन घ्याव्या अतीशय टेस्टी टेस्टी

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment