Wednesday, November 14, 2018

खारा पोंगल

खारा पोंगल

💠साहित्य :

१.तांदूळ -१५० ग्रॅम
२.मूग डाळ -१५० ग्रॅम
३.आलं :२इंच
४.काळी मिरी-२०
५.हळद:१चमचा
६.मीठ:चवीनुसार

🔘फोडणीसाठी :    
                
१.तेल/तूप,
२. मोहरी,
३.जिरं,
४.हिंग,
५.हळद,
६.कढीपत्ता,
७.हिरवी मिरची
सजवण्यासाठी कोथिंबीर

💠कृती:

१.तांदूळ आणि मूगाची डाळ दोन्हीही धुवून घ्यावे.
२.त्यामधे तिप्पट पाणी घालावे.त्यामध्ये आल्याचे बारीक तुकडे,काळी मिरी, हळद, मीठ घालून कुकरला  मऊ भात करून घ्यावा.
३.एका भांड्यात फोडणीसाठी तेल/तूप गरम करायला ठेवावे.
४.त्यामध्ये मोहरी ,जिरं,हिंग,हळद,हिरव्या मिरच्या ,कढीपत्ता टाकावे.
५.त्यात केलेला भात मिक्स करावा व पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून उकळावे. हा भात रबरबीत असतो.
६.वरून कोथिंबीर भुरभुरावी.

🔲  खारा पोंगल हा प्रकार पचायला हलका, रूचकर आहे. ताप,मंदाग्नी,अरूची, पित्ताविकार यामधे अतिशय उपयुक्त आहे.
पेशंटलाही करताना हिरवी मिरची न घालताही करावा.

डॉ. अस्मिता भस्मे.
धन्यवाद!!

#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment