खेकड्याचे भरीत
विशेष लुडबुड - सुचिकांत😛
५ खेकडे 🦀शिजवून आतील मांस काढून घ्यायचे,
२ कांदे बारीक चिरून तेलात परतायचा रंग गुलाबी झाला की त्यात आले-लसूण पेस्ट,आणि १ छोटा टोमॅटो बारीक चिरून घाला,१ चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा आणि आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा चिकन/मटण मसाला घाला थोडा वेळ परतून तेल सुटू लागले की खेकड्याचे मांस घालून एकजीव करा. मीठ चवीनुसार घाला पण खेकडे शिजवताना मीठ घातले असेल तर मीठ चाखूनच घाला आणि वरून कोथिंबीर घाला👍
राखी कोळी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment