बेसन बर्फी
साहित्य :
•२ वाट्या बेसन,सव्वा वाटी साखर,
• गरजेप्रमाणे तूप,
• गरजेप्रमाणे दूध,
•केशर काड्या,
•वेलची-जायफळ पूड,
•आवडीचे ड्रायफ्रुट काप,
• चिमूटभर मीठ.
कृती :
◆ सव्वा वाटी साखरेचा एक कप पाणी घालून फार कडक नाही असा एक तारी पाक बनवून घ्यावा.पाक होत आला की केशर काड्या आणि वेलची जायफळ पूड घालावी.
◆ एका पसरट भांड्यात बेसन घेऊन त्यात २ चमचे कोमट तूप घालावे. बेसनाला तूप चांगले चोळून घ्यावे.
◆ थोडेसे दूध बेसनावर शिंपडून छान मिक्स करावे, अशाप्रकारे दूध शिंपडत बेसन भरड होईपर्यंत करावे.
◆एका जाडसर चाळणीतून बेसन चाळून घ्यावे...छान रवाळ बेसन मिळतं.
◆भांड्यात तूप गरम झाले की बेसन घालावे आणि खमंग भाजावे, बेसन कोरडं दिसणार नाही इतपत तूप असलं पाहिजे.
◆बेसन भाजले की पाक मिक्स करावा आणि गॅस बंद करावा. छान मिक्स झाले की पुन्हा भांड गॅसवर ठेवून मिश्रण आटू द्यावे. मिश्रणाने भांड्याच्या कडा सोडल्या की तयार!
◆ट्रे सगळया बाजूंनी तुपाने ग्रीस करून घ्यावा; आणि मिश्रण एकसारखे पसरवून घ्यावे. आवडीच्या ड्रायफ्रुटस् ने सजवावे.साधारणपणे ३-४ तास रूम टेंपरेचरवर सेट होऊ द्यावे.
◆वड्या पाडून, श्रीकृष्णाला पहिला नैवेद्य ठेवावा.
!!..दिवाळी अभिष्टचिंतन..!!
जयश्री खराडे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment