भरली शिराळी
साहित्य:
•शिराळी
•सुकं किंवा ओलं खोबरं
कांदा
•लसूण ४ पाकळ्या
•तिखट,हळद,मीठ,गरम मसाला
गूळ,
•कोकम ,चिंच
•जिरं ,हिंग
कृती:
१.शिराळी धुवून त्यांची साल काढून २-३इंचाचे तुकडे करुन घ्यावे.
२.त्यांना मध्ये चीर करुन घ्यावी. वांग्याना घेतो तशी...
३.सुकं किंवा ओलं खोबरं, कांदा, ४ लसूण पाकळ्या हे तेलावर भाजून वाटून घ्यावे.
४. १ कांदा बारीक चिरून घ्यावा,कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी, तिखट, हळद,गरम मसाला,मीठ, गूळ,कोकम किंवा चिंच हे सर्व मिश्रण एकत्र करून काप केलेल्या शिराळ्यात भरावे. थोडा मसाला शिल्लक ठेवावा.
५.पँन गरम करून तेल घालावे त्यात जिरं,हिंग घालून त्यावर शिराळी व्यवस्थित लावावी. उरलेल्या मसाल्यात थोडे पाणी घालून शिराळ्यांवर वरून घालावे,
६.झाकण ठेवून शिजवावे, शिराळी शिजायला जास्त वेळ लागत नाही.
वंदना मंकिकर
धन्यवाद!!
#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
No comments:
Post a Comment