Wednesday, November 14, 2018

चुरमा लाडू

साहित्य:

१ किलो गव्हाचं पीठ,
पाऊण किलो पिठी साखर,
अर्धा किलो साजूक तूप,
१ वाटी तुपात तळलेला डिंक,
गरम पाणी

कृती:

गव्हाच्या पिठामध्ये साजूक तुपाचे मोहन घालून, गरम पाणी घालून घट्ट पीठ मळावे. त्याचे छोटे छोटे मुटके करून तुपामध्ये तळून घेणे.मुटक्यांचे तुकडे करून थोडे गरम असतानाच मिक्सरमध्ये बारीक चुरमा करून घ्या. हा चुरमा गहू चाळायच्या चाळणीने चाळून घ्या.  आता त्या मध्ये तळलेला डिंक बारीक करून घाला. त्यात पिठीसाखर घाला आणि गरज असल्यास साजूक तूप घालून लाडू वळून घ्या.

या प्रमाणात साधारण ५०-६० लाडू तयार होतात. 
◆आमच्या जैन समाजामध्ये पर्यूषण पर्वात हे लाडू बनवतात. इतर गुजराती समाजामध्ये गणपती उत्सवामध्ये हा खास नैवैद्य गणपती बापासाठी बनविला जातो.
◆लाडवावर आवडत असल्यास खसखस लावू शकता.

प्रज्ञा दोशी, तळेगांव दाभाडे
धन्यवाद!

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment