पनीर मसाला
साहित्य:
१५०ग्रॅम पनीर, २मोठे कांदे, २टोमॅटो, आले हिरवी मिरची २, तेल, तिखट, मीठ, थोडी साखर चवीला, तूप, कोथिंबीर, गरम मसाला.
कृती :
•कांदा, टोमॅटो चिरून त्यात आलं, मिरची, लसूण हे थोडं तेलावर भाजून घेणे, आणि पेस्ट करून घेणे.
•पनीर तुपात तळून घेणे.
•थोडं तूप, तेल घालून फोडणी करणे.
• मोहरी, जिरे घालून पेस्ट टाकून चांगली परतून घेणे.
•तिखट,मीठ, हळद व साखर घालणे.
•थोडं पाणी घालून मग पनीर टाकणे.
•१ उकळी काढली की पनीर मसाला तयार!!
**पोळी, बटर नान, किंवा साध्या नानसोबत खाऊ शकतो.
अंजली अतुल जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment